By  
on  

अग्गंबाई सासूबाई! अभिजीत -आसावरीचा एकमेकांच्या साथीने छोटासा संसार

‘अग्गंबाई-सासूबाई’ ही छोट्या पडद्यावरची मालिका सध्या चर्चेत आहे, ते बबड्या आणि बबड्यामुळेच. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच..ह्या म्हणीप्रमाणे  काहीसं सोहम उर्फ बबड्याच्या बाबतीत झालं आहे. त्याच्या बेताल आणि उर्मट वागण्यात तसूभरही फरक पडलेला नाहीय...अभिजीत राजेंनी आपली सर्व प्रॉपर्टी बबड्याच्या नावे करून दिलीय. त्यामुळ ते आता अगदी सामान्य जीवन जगतायत. 

पण जरी त्यांची प्रॉपर्टी बबड्याे हिसकावून घेतली असली ती ते अद्यापही श्रीमंतच आहेत. कारण त्यांना या प्रसंगात खंबीर साथ मिळतेय , ती म्हणजे त्यांच्या पत्नीची आसावरीची. हलाकीच्या परिस्थितीतही ते एकमेकांच्या साथीने सुखात जगतायत. ऐशोरामात जगणा-या अभिजीत राजेंना आता बबड्यामुळे एका छोट्याशा खोलीत आपला संसार थाटावा लागलाय. पण त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. कारण त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आसावरी आहे. दोघंही आता छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतायत. 

 

 

 

आता आणखी अग्गंबाई सासूबाई  मालिकेत कोणतं वळण येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive