By  
on  

‘सुखी माणसाचा सदरा’ मालिकेच्या सेटवर अशी सुरु आहे कलाकारांची धमाल

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांची सुखी माणसाचा सदरा ही मालिका अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या निमित्ताने केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी पुन्हा एकदा नव्याने सोबत काम करतेय. 
या मालिकेत अभिनेता भरत जाधव आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेतील  कलाकारांचं ऑनस्क्रीन ट्युनिंग तर उत्तम आहेच. पण ऑफस्क्रीन ट्युनिंगही धमाल आहे.

 

 

रोहिणी हट्ट्ंगडींनी नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये रोहिणी ताईं, कावेरी आणि मैना धमाल डान्स मुव्हज करताना दिसत आहेत. यासोबत भरत जाधव यांनीही एक व्हिडियो शेअर केला यामध्ये ते आणि मोरु ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. एकंदरीत शुट दरम्यान या कलाकारांची धमाल पाहून प्रेक्षकही खुष होतील.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive