By  
on  

आदित्य म्हणजेच विराजस ‘माझा होशील ना’ मधील या सीनची पाहात होता आतुरतेने वाट

‘माझा होशील ना’ ही मालिका आता अगदी निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतील सई आणि आदित्य आता एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याच्या अगदी समीप आहेत. यावेळी विराजसने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने स्क्रिप्टच्या त्या ओळींचा फोटो शेअर केला आहे.

 

 

ज्यात आदित्य सईवरचं प्रेम कबूल करतो. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये विराजस म्हणतो, ‘बरोब्बर एका महिन्यापूर्वी, संवादाच्या त्या ओळी असलेलं स्क्रिप्ट माझ्या हाती आलं, ज्यांची मी मनापासून वाट बघत होतो. माझा होशील ना च्या पहिल्या एपिसोड पासून ज्या दिशेने सगळं चालू होतं, त्याचं मर्म ह्या मोजक्या शब्दांमध्ये, ह्या साक्षात्कारामध्ये, आदित्यच्या मनामध्ये सापडलंय. अधून मधून हातामध्ये असा सीन लिहून येतो जो फक्त एक प्रसंग नसतो. आपल्या पात्राच्या प्रवासात मनाने गुंतलेल्या प्रत्येक प्रेक्षकासाठी एक सुखाचा निःश्वास असतो.

हा फोटो मी तेव्हाच काढून ठेवला होता - ह्या कथेचा, पात्राचा, आपल्या ह्या प्रवासाचा एक मैलाचा दगड म्हणून. कारण आता सगळंच बदलणार आहे. रस्त्यात खूप वळणं आणि अडथळे येणारच, पण आजची रात्र मात्र आपण आदित्य बारोबर साजरी करूयात...’ चाहत्यांना अर्थातच या दोघांची लव्हस्टोरी कशी फुलते हे पाहण्याची उत्सुकता असेलच

Recommended

PeepingMoon Exclusive