By  
on  

ब्रम्हेंच्या घरी येतोय नवा सदस्य, जुळणार का आदित्यशी सूर

‘माझा होशील ना’ या मालिकेत नवे नवे ट्वीस्ट येताना दिसत आहेत. एकीकडे आदित्य सईसोबतच्या नात्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधतो आहे. तर एकीकडे ब्रम्हेंच्या घरी नवा सदस्य येऊ घातला आहे. सिंधू जगदीश ब्रम्हे म्हणजेच दादा मामांची बायको ब्रम्हेंच्या घरी येण्यासाठी सज्ज झाली आहे.

 

 

पण आदित्यबाबतचं तिचं मत फारसं खास नाहीये. अभिनेत्री सिमा देशमुख सिंधू ब्रम्हेंच्या भूमिकेत आहेत. आदित्यच्या  जन्मानंतर त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने त्याला अपशकुनी मानत असते. त्यामुळे या मामीशी आदित्यचे सूर जुळतात का हे पाहणं रंजक ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive