‘आई कुठे काय करते’ मालिकेने मिळवली प्रेक्षकांच्या पसंतीची पावती

By  
on  

‘आई कुठे काय करते' या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.  मालिकेची कथा आणि मालिकेतील विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.  या कलाकारांची जशी ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहायला मिळते तशीच ऑफस्क्रिनही त्यांचं घट्ट नातं निर्माण झालं आहे.

 

त्यामुळेच मालिकेतील व्यक्तिरेखाही लक्षवेधी ठरल्या आहेत. या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेचा बहुमान मिळवला आहे. अरुंधतीची व्यक्तिरेखा साकारणा-या मधुराणी प्रभुलकर यांनी पोस्ट शेअर करत ही बाब चाहत्यांशी शेअर केली आहे.  मालिकेतील आईचं मुख्य पात्र अरुंधतीच्या आयुष्यात सध्या काय उलथापालथ होत आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.  प्रेक्षकांनी दिलेल्या या पसंतीच्या पावतीने मालिकेतील कलाकारांचं मनोबल नक्कीच वाढलं असेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share