लतिकाचं अभिसोबतच्या नात्याबाबत सुचक वक्तव्य, काय असणार अभिमन्युची प्रतिक्रिया

By  
on  

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात चांगलंच स्थान मिळवलं आहे. पण आता यात एक नवा ट्वीस्ट येतो आहे. लतिका आणि अभि यांच्यातील नातं प्रेमाने नाही तर कराराने बांधलं गेलं आहे. सज्जनरावांशी लग्न मोडल्याने आणि बापूंचे पैसे परत न देऊ शकल्याने लतिका आणि अभ्याला एकमेकांशी लग्न करावं लागलं होतं.

 

 

आता एकमेकांशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच लतिकाने पुन्हा एकदा अभिसोबतच्या कराराची बाब छेडली आहे. बापूंना दिलेले पैसे परत कधी देणार याबाबत लतिका विचारणा करते. यासोबतच अभिबरोबर झालेल्या कराराची जाणीवही करून देते. यावर अभि विचारात पडताना दिसतो. आता काय असेल भवितव्य अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याचं हे मात्र लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share