‘माझ्या नवऱ्याची बायको’मधून ही अभिनेत्री घेणार एक्झिट?

By  
on  

कितीही ट्रोल करा, नावं ठेवा तरीही छोट्या पडद्यावरची अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ ही  मालिका सध्या सुपरहिट असून मालिकेतील पात्र हे सतत चर्चेत असतात. या मालिकेचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेत अनेक नवनवे ट्विस्ट आणि टर्न्स येत असतात. त्यामुळे ही मालिका पाहणं रंजक ठरतं. आता ह्या मालिकेसंदर्भात एक खळबळजनक बातमी समोर येतेय. 

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हे पात्र मालिका सुरु असल्यापासूनच लक्षवेधी ठरतंय. ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील साकारतै आहे. पण कदाचित लवकरच ती या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचं बोललं जात आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

शनाया ही मालिकेत  सध्या रेडिओ जॉकी बनली आहे. पण शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर. जे बिंदूराणीला फोन करतो आणि त्यांची पुन्हा भेट होते. या भेटीनंतर शनाया परदेशात निघून जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे शनाया म्हणजेच रसिका सुनील लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. 

 

मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनाया हे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका विशेष गाजली होती. त्यांनतर शनायची भूमिका अभिनेत्री इशा केसकरने साकरली. पण काही कारणास्तव इशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मालिकेत रसिकाची एण्ट्री झाली

Recommended

Loading...
Share