By  
on  

संजीवनीने घेतला मोठा निर्णय, मिळवून देणार का ढाले पाटलांचा मान

‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत आता हटके वळण येऊ घातलं आहे. रणजीतपासून लपवलेले तिच्या वयाचे सत्य सगळ्यांसमोर आलं आणि या जोडीला जणू कुणाची तरी दृष्ट लागली. संजुच्या वयाचे सत्य रणजीत आणि ढाले पाटील कुटुंबासमोर आलं. संपूर्ण ढाले पाटलांची कुटुंबाची अब्रू या प्रकरणाने धुळीला मिळाली. रणजीतची वर्दी गेली. या प्रकाराने रणजीत पुरता खचून गेला आहे. या प्रकारामुळे रणजीत पुण्याला निघून गेला आहे. 

 

 

पण त्याच्या अशा जाण्याने संजीवनीन मात्र कोलमडून गेली आहे. तीने आता एक निश्चय केला आहे. ढाले-पाटलांच्या घराला वर्दीचा मान पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी संजीवनीने कंबर कसली आहे. संजीवनी आता पोलिस होण्यासाठी प्रयत्न करताना दिसते आहे. तिच्या या प्रयत्नांना घरच्यांची साथ मिळते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive