वाढदिवशी अरुंधतीने अनिरुध्दला दिलं हे रिटर्न गिफ्ट, पाहा ‘आई कुठे काय करते’ मालिका निर्णायक टप्प्यावर

By  
on  

‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या टेलिव्हिजनवरची सर्वात लोकप्रिय कौटुंबिक मालिका ठरतेय. मालिकेत आई साकारणा-या अरुंधती फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले हिने रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आई म्हणून तिची ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजतेय.
 

सध्या ह्या मालिकेत एक निर्णायक टप्पा आला आहे. यश, अभि, इशा या मुलांनी आईचा यंदाचा वाढदिवस खास व्हावा यासाठी जय्यत तयारी केली आहे. आपल्या परीने ती आनंदी कशी राहील यासाठी आप्पांसहित सर्वजण प्रयत्नशील आहेत .पण इथे स्वावलंबी झालेल्या  अरुंधतीने मात्र एक वेगळाच निर्णय घेतला आहे. तिने वाढदिवसाच्याच दिवशी पती अनिरुध्दला घटस्फोटाची नोटीस पाठवत रिटर्न गिफ्ट दिलंय. त्यामुळे साहजिकच अनिरुध्द प्रचंड संतापलाय आणि तो थेट अरुंधतीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये येऊन पोहचलाय. 
 

संजनासाठी घर सोडून गेलेल्या पती अनिरुध्दला ना आई-वडीलांची किंमत ना मुलांची. अशा व्यक्तिसोबत पुन्हा एकत्र राहता येणार नाही हा निश्चय अरुंध्दतीने केलाय. त्यामुळे पार्टीतल्या पती-पत्नींच्या या शाब्दीक बाचाबाचीनंत पुढे नेमकं काय घडणार, दोघांचे मार्ग कायमचे वेगळे होणार का ?, हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

मालिकेतल्या या निर्णायक वळणाबद्दल सांगताना अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर म्हणाल्या, ‘एकेकाळी अनिरुद्धवर मनापासून प्रेम केल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेणं अरुंधतीसाठी सोपी गोष्ट नाही. या परिस्थितीचा सामना खूप धाडसाने आणि धैर्याने करायचं तिने ठरवलं आहे. आई कुठे काय करते मालिकेतून स्थिर असा स्त्रीवाद दाखवण्यात येत आहे. कुठेही आरडाओरडा नाही, स्त्रीमुक्ती चळवळीच्या घोषणा नाहीत, आक्रस्ताळेपणा नाही. अरुंधती अत्यंत ठामपणे आणि सत्सकविवेकबुद्धीला स्मरुन शांतपणे निर्णय घेते हे तिच्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण आहे. या सगळ्यात घरातल्या जबाबदाऱ्या न नाकारता इतर कोणतीही नाती न विस्कटू देता ती तिच्या न्यायासाठी लढते आहे.’ 

 

आजवर अरुंधतीचं खंबीर रुप प्रेक्षकांनी पाहिलं आहे. त्यामुळे अरुंधतीचा पुढचा प्रवास कसा असणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. त्यासाठी न चुकता पाहा ‘आई कुठे काय करते’ दररोज सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Recommended

Loading...
Share