
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत हटके वळण येऊ घातलं आहे. इतके दिवस अनिरुद्धच्या भोवताल असलेलं अरुंधतीचं आयुष्य आता अचानक बदललं आहे. अरुंधतीला एकटं न वाटू देण्यासाठी घरचे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातच अरुंधतीच्या वाढदिवसानिमित्त घरच्यांनी खास सरप्राईज अरेंज केलं आहे.
अरुंधतीला मुलांनी सकाळी उठल्या उठल्या बुके देऊन तिला चांगलं सरप्राईज दिलं आहे. मुलांच्या या सरप्राईजमुळे अरुंधती चांगलीच खुष झाली आहे. तर अनिरुध्दची तिच्या वाढदिवसादिवशी काय प्रतिक्रिया असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.