अभ्या आणि लतीवर सक्रांतीदिवशी कोणतं विघ्न येणार?

By  
on  

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे ते साध्या, गोड लतिकाने. अभ्या आणि लतीच्या आंबटगोड केमिस्ट्रीने मालिका अधिक रंगतदार बनली आहे. 
पण आता अभ्या आणि लतिकाचं नातं एका कसोटीच्या उंबरठ्यावर आहे. हेमाला या ना त्या कारणाने लतिका आणि अभ्याच्या डीलबाबत समजलं आहे. त्यामुळे रागाचा वणवा तिने प्रत्येकाच्या मनात पेटवला आहे. 

 

 

हाच राग कामिनीने लतिकावर काढला आहे. लतिका आणि अभ्याच्या पहिल्या संक्रांतीच्या कार्यक्रमात कामिनीने त्यांच्या नात्याचं सत्य सगळ्यांसमोर आणलं आहे. तिच्या या वागण्याने लति आणि अभ्याच्या नात्याचं सत्य सगळ्यांसमोर आलं आहे. आता अभ्या कामिनीचा वार पलटवण्यासाठी लतिकाच्या मागे उभा राहिल का हे लवकरच समजेल.

Recommended

Loading...
Share