अभिमन्यु- लतिकाच्या प्रयत्नाला यश, अशी होणार स्वप्नपुर्ती

By  
on  

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत आता हटके वळण आलं आहे. अभिमन्यूने पाहिलेलं स्वप्न आता कुठे साकार होऊ लागलं आहे. अभिमन्युला गावात अ‍कॅडमी सुरु करायची आहे. त्याचं हे स्वप्न त्याची मैत्रिण असलेल्या लतिकाने जपलं आहे. 
सज्जनकडून लोन घेतल्यानंतर लतिकाने अभिला या अकॅडमीच्या उभारणीसाठी प्रेरणा दिली.

 

 

या कामात बारीक-सारीक मदतही तिने केली. हे सगळं पुर्ण होऊन अ‍कॅडमीचा पायाभरणी समारंभावेळी अभिमन्युने लतिकाला या कामाचं श्रेय दिलं. यामुळे लतिकाच्या चेह-यावरील आनंद लपताना दिसत नाही. आता या मैत्रीच्या नात्याचं रुपांतर प्रेमात होणार का ते लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share