By  
on  

टीआरपीच्या स्पर्धेत या वाहिनीची बाजी, पाहा कोणती मालिका आहे टॉपवर

टीआरपी रेटिंगमुळे मालिकांची जनमानसातील लोकप्रियता लक्षात येत असते. ज्या मालिकेचा टीआरपी जास्त अर्थातच तिचा प्रेक्षकवर्गही तितकाच मोठा असतो. यंदाचा टीआरपी रिपोर्ट मात्र हटके आहे. यावेळच्या टीआरपीमध्ये स्टार प्रवाहचा बोलबाला आहे. यात नंबर एकला आहे ‘मुलगी झाली हो’ ही मालिका. नेहमीपेक्षा वेगळं कथानक असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

दुस-या नंबरला स्टार प्रवाहचीच फुलाला सुगंध मातीचा ही मालिका आहे. तर पुन्हा एकदा स्टार प्रवाहने आघाडी घेत तिस-या नंबरलाही स्टार प्रवाहची ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका आहे. तर चौथा नंबर मात्र झी मराठीने पटकावला आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ ही मालिका चौथ्या नंबरला आहे. तर पाचवा नंबर पुन्हा एकदा स्टार प्रवाहचाच आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने या यादीत पाचवं स्थान मिळवलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive