By  
on  

मंजुळानंतर ‘देवमाणूस’ मध्ये झाली या बोल्ड अभिनेत्रीची एंट्री

देवमाणूस मालिकेत आता नवा ट्वीस्ट येऊ घातला आहे. देवमाणूस मालिका प्रेक्षकांना आवडते आहे हे वेगळं सांगायला नको. उत्कंठा वाढवणारं कथानक, कलाकारांचा अभिनय याने ही मालिका सजली आहे.  हटके कथानक आणि मर्डर मिस्ट्री असलेली ही मालिका आता हटके वळणावर येऊन ठेपली आहे.  

 

 

 

डॉक्टरने अत्यंत निघृणपणे मंजुचा खुन केला आहे. या दरम्यान मालिकेत एक नवी एंट्रीही झाली आहे. पण इतरांपेक्षा ही एंट्री काहीशी हटके आहे. कारण नवीन व्यक्तिरेखा इतर व्यक्तिरेखांच्या मानाने जास्त स्टायालिश आहे. या मालिकेत आता अभिनेत्री नेहा खान दिसते आहे. गुरुकुल, शिकारी या सिनेमात ती दिसली होती. आता नेहा आपल्या अदांमुळे मालिकेत काय खळबळ उडवते हे लवकरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive