By  
on  

पम्मी आऊट, मंजू इन, अपूर्वा नेमळेकरने सोडली ही मालिका?

 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंताच्या भूमिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. या मालिकेने तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. शेवंता हीच अपूर्वाची खरी ओळख बनली. 

 ही मालिका संपल्यानंतर लगेचच अपूर्वाला दुसरी मालिका मिळाली. तुझं माझं जमतंय या मालिकेतली तिची पम्मी ही भूमिकाही प्रेक्षकांना आवडली. पण आता ही पम्मी लवकरच मालिका सोडणार असल्याचं समजतंय. 

अपूर्वा सध्या तुझं माझं जमतंय या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतल्या पम्मी या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र तिने आता ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत . एबीपी माझाच्या वृत्तानुसार, अपूर्वा आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रीकरणाच्या तारखांसंबंधी वादही झाला होता. त्यामुळे अपूर्वा या मालिकेला रामराम ठोकतेय.

तिच्या जागी आता पम्मीची भूमिका अभिनेत्री प्रतिक्षा जाधव करणार असल्याचं कळतंय. देवमाणूस मालिकेतली गाजलेली मंजूची भूमिका प्रतिक्षा साकारत होती. मंजूचा मृत्यु झाल्याचं मालिकेत दाखवलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive