By  
on  

झोप हा.. नाहीतर आण्णा नाईक येतील.........., पाहा नवा प्रोमो

छोट्या पडद्यावरची सर्वांची लाडकी आणि क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी मालिका 'रात्रीस खेळ चाले  'ही आहे. अवघ्या महाराष्ट्राला या मालिकेने वेड लावलं. दोन्ही भाग तितकेच सुपरहिट ठरले.  आता या मालिकेच्या तिस-या भागाची नांदी होऊ घातली आहे. या मालिकेचे ख-या अर्थाने हिरो ठरले ते आण्णा नाईक. 

 

 

आता आण्णा नाईक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  झी मराठी वाहिनीच्या सोशल मिडीया पेजवर एक थरारक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अंधारात जरब निर्माण करणारे आण्णा नाईकांचे डोळे बघूनच थरकाप होत होता. आता या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये एक आई बाळाला झोपवत आहे. पण बाळ सतत रडताना दिसते. तेवढ्यात आई त्या बाळाला म्हणते की, झोप नाहीतर आण्णा नाईक येईल. हे ऐकताच बाळ एकदम शांत होते. या प्रोमोवरून आगामी भागात आण्णा नाईकांची दहशत पुन्हा अनुभवता येणार आहे असंच दिसतं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive