By  
on  

'अग्गंबाई सूनबाई' सोहमच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिध्द अभिनेता

काही काळानंतर कुलकर्णी घरात बरेच बदल दिसून येतात. आसावरी मोठ्या कंपनीची मालकीण झाली आहे. पूर्ण आत्मविश्वासाने तिने आता  ऑफीस हातात घेतले आहे. तीच्या सोबत तिचा सोहम आता सक्षमपणे सर्व कारभार  बघतोय. तसेच अभिजित राजेंनी त्यांच्या style ने स्व खुषीने घर सांभाळायला घेतले आहे. शुभ्रा ने आई पण स्वीकारून तिच्या मुलाची म्हणजे बबडूची जबाबदारी सांभाळत नव्या संसाराला सुरुवात केली आहे. अश्या ह्या कुलकर्णी कुटुंबात शुभ्राला संसाराच्या काही Tips देत आसावरी पुन्हा शुभ्राला Independent करण्यच्या मार्गावर हे कथानक आधारले आहे. ह्या निमित्ताने उमा पेंढारकर च्या रूपाने एक फ्रेश चेहेरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.पण त्याचसोबत या मालिकेत आणखी एक मोठा बदल होणार आहे तो म्हणजे सोहमच्या भूमिकेत आता आशुतोष पत्की नाही तर नवा अभिनेता ही  भूमिका साकारणार आहे. 

आशुतोष पत्कीला बबड्याच्या भूमिकेमुळे अमाप लोकप्रियता मिळाली. त्याच्या नकारात्मक भूमिकेचं द्वेष करुनच कौतुक झालं. घराघरांत बबड्याचीच चर्चा असायची. आता सोहम उर्फ बबड्याच्या भूमिकेत माझ्या नव-याची बायको फेम सौमित्र म्हणजेच अभिनेता अद्वैत दादरकर झळकतोय.

सौमित्रच्या भूमिकेमुळे अद्वैत रसिकांचा लाडका बनलाय. आता सोहमच्या या नव्या भूमिकेतून तो प्रेक्षकांसमोर येतोय. याशिवाय नवी शुभ्रा-सोहमची जोडी ऑनस्क्रीन कशी केमिस्ट्री दाखवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

‘अग्गबाई सुनबाई’ पाहायला विसरू नका १५ मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive