By  
on  

मुंबईच्या लोकलमध्येही दिसला अण्णा नाईकांचा दरारा , पाहा Video

रात्रीस खेळ चाले आणि रात्रीस खेळ चाले भाग २ हे मालिकेचे दोन्ही भाग रहस्य आणि अण्णा नाईकांच्या रासलीलांनी गाजले. ह्या दोन्ही सीझन्सनी रसिक प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील प्रत्येक व्यक्तिरेखांनी आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षक या मालिकेला मिस करत असतानाच आता ह्या मालिकेचा पुढचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अण्णा नाईक परत येणार..असे प्रोमोज सध्या झी मराठीवर झळकतायत. 

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या आगामी सीझनचा एक लक्षवेधी प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मंबईच्या लोकलमधला रात्रीचा हा प्रसंग आहे. सर्व प्रवासी गप्पा-गोष्टींमध्ये गुंग असतानाच त्यांना ट्रेनच्या सर्व डब्ब्यांवर अण्णा नाईक परत येणार...अण्णा नाईक परत येणार..असं लिहलेलं पहायला मिळतंय. प्रत्येक जण अण्णा नाईकांची खिल्ली उडवतो..तेवढ्यात बाहेर खिडकीतून अण्णा नाईक दिसतात आणि त्यांचा दरारासुध्दा पाहायला मिळतो. सर्वच प्रवाशी क्षणार्धात दचकतात. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive