By  
on  

पाहा Video : आई काळुबाई आर्यासाठी अवतरणार बालिका रूपात!

सोनी मराठी वाहिनीवरची 'आई माझी काळुबाई' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. सोशल मिडियावर त्याची विशेष चर्चा  सातत्यानं होताना दिसते.  ‘आई काळुबाई’ हे साताऱ्या जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे. 
मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते. 

 

 

आर्या आणि अमोघ यांना दूर करण्याचे सईचे म्हणजेच पर्यायानी विराटचे सगळे प्रयत्न फसल्यावर विराट ठरवतो की, काही झालं तरी आर्या आता पाटलांच्या घरात राहणं धोक्याचं आहे. देवळापर्यंतचे मार्ग बंद केलेच आहेत, पण आर्या नजरकैदेत राहिली तर बरं म्हणून विराट तिला एका काळोख्या भुयारात अडकवतो. आर्या आई काळुबाईला साद घालते आणि देवी थेट बालिका रूपात अवतरते. भक्त आणि देवी यांच्यातल्या अनोख्या नात्याचा हा टप्पा रविवारी, २१ मार्च रोजी होणार्‍या  ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या संध्याकाळी सात वाजता होणार्‍या महाएपिसोडमध्ये उलगडणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive