By  
on  

प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘देवमाणूस’ लवकरच घेणार निरोप?

छोट्या पडद्यावरची लाडकी आणि क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. एका बोगस डॉक्टरची ही कथा आहे. ही मालिका सत्यघटनांवर आधारित आहे.  एका बोगस डॉक्टरच्या कुकर्माची गोष्ट या मालिकेने जगासमोर आणली. गोड स्वभावाने भाबड्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढणा-या एका बोगस डॉक्टरची ही मर्डर मिस्ट्री मालिकेच्या प्रेक्षकांनी पाहिली. 

 

 

ही मालिका आता निरोपाच्या उंबरठ्यावर आहे की काय असं वाटू लागलं आहे.  २१ मार्च रोजी या मालिकेचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता पोलिसांसमोर या देवीसिंग म्हणजेच डॉ. अजित याचा खरा चेहरा समोर येणार आहे. विशेष म्हणजे डिंपलने पोलिसांना अजित यांच्याबाबत खरं खरं सांगून टाकलं आहे. त्यामुळे आता तरी अजित कुमारला पोलिस अटक करणार का? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive