By  
on  

लतिकासाठी अभिमन्यूचं खास प्लॅनिंग, पण दौलत उधळणार का डाव ?

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील वेगळं कथानक सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. आता मालिकेत अभिमन्यू आणि लतिकाचं वेगळं नात पाहायला मिळत आहे. यापुर्वी एकमेकांशी क्षणभरही न पटणारे अभि-लती  संकटात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. 

 

 

अभिच्या मनात आता लतिविषयी प्रेम निर्माण झालं आहे. लतिचा स्वभाव, समंजसपणा यामुळे अभि लतीकडे आकर्षित झाला आहे. लतिचा वाढदिवस खास करण्यासाठी अभ्याने सुरेख प्लनिंग केलं आहे. पण ऐनवेळी दौलत तिथे येऊन रंगाचा बेरंग करताना दिसणार आहे. दौलतचा राग अभिच्या जीवावर बेतणार का? की लति नेहमीप्रमाणे त्याच्या पाठीशी उभी राहणार हे मात्र लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive