संजनाची अनिरुद्ध विरोधात आगपाखड, दिली ही धमकी

By  
on  

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आता रंजक वळण आलं आहे. अनिरुद्धच्या घरच्यांच्या मनात जागा मिळवण्यासाठी संजना घरी येऊन राहिली आहे खरी. पण अजूनही ती घरच्यांची नावडतीच आहे. अनिरुद्धने तिला लग्न करण्याचा शब्द दिला आहे. पण घरी आल्यापासून त्याचा जीव घरच्यांमध्ये अधिकच गुंतत चालला आहे. हे पाहून संजनाचा मात्र सतत तिळपापड होताना दिसतो आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

यावेळी मात्र तिने सगळ्या घरच्यांसमोरच अनिरुद्धला जाब विचारला आहे. केवळ अरुंधतीला सोडण्याचं स्वप्न त्याने आजवर दाखवलं असल्याचंही तिने सांगितलं. यावर माईंनी देखील अनिरुद्ध घरच्यांशीच जोडलेला कायम राहिल असं संजनाला निक्षुन सांगितलं. यावर संजनाने अनिरुद्धला पोलिस तक्रार देण्याची धमकी दिली आहे. यावर आता ती खरंच असा निर्णय घेईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

Loading...
Share