By  
on  

'गाथा नवनाथांची' या पौराणिक मालिकेत व्हीएफएक्सच्या मदतीने उलगडणार अनेक प्रसंग

कलियुगात जेव्हा  असुरी शक्ती मनुष्यावर वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येते आहे. 'गाथा नवनाथांची' ही मालिका २१ जूनपासून सोम.-शनि., संध्या. ६:३० वा.  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'गाथा नवनाथांची' या मालिकेतून आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. मच्छिन्द्रनाथांच्या जन्माची कथा सर्वश्रुत असली, तरी त्यांच्या बालपणाबद्दलची माहिती फार लोकांना  नाही. त्यांचं बालपण, संगोपन अशा गोष्टी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.  मालिकेच्या टीमने त्यासाठी सखोल अभ्यास केला आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.

ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे.

काही प्रसंग दाखवण्यासाठी व्हीएफएक्स या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मराठीत व्हीएफएक्सचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळे या मालिकेतील व्हीएफएक्स हा एक महत्त्वपूर्ण आणि विशेष मुद्दा असणार आहे.

 

२१ जूनपासून सोम.-शनि., संध्या. ६:३० वा. 'गाथा नवनाथांची' ही मालिका प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive