ऐश्वर्या सुर्यभानकडे पैशाची पेटी देऊन करणार ही मागणी

By  
on  

काहीशा नाखुशीनेच का होईना सुर्यभानने अल्लड ऐश्वर्याशी लग्न केलं आहे. आता ऐश्वर्या आणि त्यांच्यातील आंबट गोड नातं आकाराला येताना दिसत आहे. सुर्यभानच्या रुक्ष स्वभावाशी ऐश्वर्या तिच्या निरागसपणाला अनुसरुन वागताना दिसते आहे. 
ऐश्वर्यामुळे सुर्यभानचा वेळ वाया गेला याची बोच तिला आहे. गैरसमज होऊ नयेत यासाठी नवा मोबाईल घेण्याचं ठरवते.

 

 

पण यासाठी लागणारे पैसे तिच्याजवळ नसतात. अशावेळी तिला लग्नापुर्वी साठवलेल्या पैशाची आठवण होते. हे पैसे देऊन ती सुर्यभानकडून मोबाईल मागवून घेण्याचं ठरवते. त्यामुळे हे पैसे घेऊन ती सुर्यभानला तिच्यासाठी मोबाईल आणायची विनंती करते. आता सुर्यभानला ही बाब लक्षात राहिल का? मोबाईलबाबत काहीही ज्ञान नसलेल्या ऐश्वर्याला तो वापरता येईल का? हे समजण्यासाठी मात्र मालिकाच पहावी लागेल.

Recommended

Loading...
Share