वटपौर्णिमेच्या पुजेला संजीवनीला मिळणार रणजितची साथ

By  
on  

राजा रानीची जोडी मालिकेमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आहे. संजुने आता रणजीतचे स्वप्न पूर्ण केले आहे. PSI झाल्यापासून तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पण संजु घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडताना दिसते आहे. राजश्री आणि अपर्णा दोघी मिळून संजुसाठी काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा सतत प्रयत्न देखील करत आहेत.

 

पण त्यांच्या सगळ्या कारस्थानांना संजु उत्तर देत आहे. याच सगळ्यामध्ये आता अजून एक भर म्हणजे गुलाब भोसले. गुलाब संजुच्या पहिल्या दिवसापासून विरोधातच आहे. त्यामुळे संजीवनीची वटपौर्णिमेची पूजा कशी पूर्ण नाही होणार याच्या प्रयत्नात गुलाब आहे तर दूसरीकडे कुसुमावतीला देखील संजुने वटपौर्णिमाची पूजा करणार असे वचन दिले आहे. रणजीतच्या साथीने संजू ही पूजा कशी पार पाडणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

 

Recommended

Loading...
Share