ठरलं तर या दिवशी आणि यावेळी मुक्ता आणि उमेशची मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

प्रेक्षकांची लाडकी जोडी मुक्ता आणि उमेश ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापुर्वी ही रोमँटिक जोडी लग्न पहावे करून या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता जवळपास सात वर्षांनी उमेश टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय.  यासोबत मुक्ताही तब्बल चार वर्षांनी मालिका विश्वात पुनरागमन करतेय. 

 

 

या मालिकेच्या प्रसारणाची वेळही समोर आली आहे. 12 जुलैपासून ही मालिका रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमाला कुठे असते एक्सपायरी डेट" असं म्हणत प्रदर्शित केलेला मालिकेचा प्रोमोही रंजक वाटतोय, तेव्हा या मालिकेत मुक्ता-उमेशची केमिस्ट्री रंगत आणणार एवढं नक्की.

Recommended

Loading...
Share