By  
on  

वटपौर्णिमेदिवशीच अभि-लतीच्या नात्यात पडणार मिठाचा खडा?

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो.सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात वडाला पाच प्रदिक्षणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये लतिका वटपौर्णिमा साजरी करणार आहे.

 

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये लतिका आणि अभीच्या लग्नाचे सत्य कामिनी सगळ्यांसमोर आणणार आहे. अभि – लतीचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण बापूंचे पैसे मिळाल्यावर अभी लतिकाला बापूंना साभार परत करणार हे मात्र घरातील कोणालाच माहिती नाही. अभिमन्यु आणि लतिकाने हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवले.

 

आता मात्र लतिका निर्णयावर पोहचली आहे की ती अजून त्यांच्या नात्याबद्दल अजून लपवू शकणार नाही आणि सगळ्यांना सांगणार. कामिनीला मात्र हे सत्य माहिती आहे आणि ती वटपौर्णिमेच्या दिवशी लतिका आणि अभिच्या घरच्यांसमोर ही गोष्ट उघडकीस आणणार आहे, की यांचे लग्न खोट आहे. आता पुढे काय घडणार ? यानंतर दोघांचे नाते कुठलं नवं वळण घेणार ? लतिका आणि अभी कसे या घटनेला सामोरे जाणार ? घरच्यांना कसे सांभाळणार ? हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा सुंदरा मनामध्ये भरली.

Recommended

PeepingMoon Exclusive