By  
on  

अजित देव आणि देवीसिंग या दोन वेगवेगळ्या व्यक्ती? मालिकेत नवा ट्वीस्ट

देवमाणूस मालिकेत आता एकदम रंजक वळण आलं आहे. अजितचा पर्दाफाश होऊन दिव्या सिंगच्या हाती लागला आहे. दिव्या सिंगला डॉ अजितकुमार विरोधात सापडलेले पुरावे या सर्व गोष्टींमुळे मालिका एका निर्णायक वळणावर येताना दिसत आहे. पण खुद्द अजितनेच डिंपलजवळ याचा खुलासा केला आहे. नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये हे दिसून आलं आहे.

 

 

अजित डिंपलला एका गाडीत ठेवलेली फाइल चोरून आणण्यास सांगतो. त्या फाइलमधील कागदपत्रांवरील नाव पाहून तिला धक्का बसतो. त्यावर डॉ. अजित कुमार देव असं लिहिलेलं असत. ते पाहून तिला धक्का बसतो. तर डॉक्टर तिला तो माझा सख्खा भाऊ असल्याचं सांगतो. हे ऐकून डिंपल चकित होते. आता मालिकेत डॉ. अजित कुमार देव यांच्याबद्दल आणखी किती खुलासे होणार ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive