By  
on  

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत ह्या नव्या कलाकाराची एन्ट्री

'येऊ कशी तशी मी नांदायला'  ही झी मराठीवरील मालिका सध्या प्रसिध्दीच्या शिखरावर आहे. ह्यात ओम आणि स्विटूची प्यारवाली लव्हस्टोरी प्रचंड गाजतेय. त्यात ओमची मालविका ताई खेळत असलेली नवनवी खेळी व स्विटूची आई नलू सतत या नात्याला करत असलेला विरोध यामुळे ही मालिका खुप रंजक बनत्ये. पण आता या मालिकेत एका नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री होताना पाहायला मिळतेय. 

मालिकेत आता स्वीटू एका पार्लर मध्ये काम करताना दाखवलीय. त्या पार्लर मधील मालकीण आता स्वीटू साठी स्थळ शोधून आणतेय त्याच नव्या पात्राची आता एन्ट्री होणार आहे हे नवीन पात्र नक्की आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत स्वीटूला लग्नासाठी पाहायला येणाऱ्या गट्टू या नव्या पात्रच खरं नाव आहे “मनमीत पेम”. मनमीत पेम ह्या कलाकाराला तुम्ही ह्यापूर्वी देखील चित्रपट आणि मालिकांत पाहिलं असेल. “टाईमपास”, “व्हेंटिलेटर”, “फोटोकॉपी” अश्या अनेक चित्रपटांत तो झळकला आहे. तर प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू सिनेमामध्येसुध्दा मनमीतने  महत्त्वपूर्ण बूमिका साकारलीय. 

 

स्वीटू प्रमाणेच हे नवीन पात्र जाड असल्याने दोघे पाणीपुरी खायला जातानाच्या सीन मध्ये त्याच्यावर लोक हसून जोक मारतात त्यावेळी स्वीटू त्या लोकांना एखाद्याच्या शरीरावरुन त्याची टिंगल करू नये असे सुनावते.

आता स्विटू आणि या नव्या स्थळाचं नलू मावशी लग्न लावून देणार का, स्विटू या स्थळाला नकार देऊ शकेल का, ओमला हे कळल्यावर तो काय पाूल उचलेल हे सर्व पाहाणं रंजक ठरणार  आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive