पाहा Video : दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करत ओम आणि स्वीटूची लव्हस्टोरी होणार का पूर्ण ?

By  
on  

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत आता स्वीटू आणि ओम ह्यांच्या प्रेमाची माहिती त्यांच्या घरच्यांना झालेली आहे. ओम ची आई शकू दोघांच्या लग्नाला तयार असली तरी स्वीटू ची आई नलू हिचा मात्र विरोध आहे. पावसात भिजून स्विटूसाठी होकार मिळवण्याचा प्रयत्न करणा-या ओम समोर आता दादांनी एक अजब अट घातलीय.

ओमला त्याचं संपूर्ण ऐशोआरामाचं घर सोडून स्विटूच्या कुटुंबियांसारखंच १५ दिवस गरिबीत आणि कष्टाने कमवून रहायचं आहे. या वरपरिक्षेत जर ओम यशस्वी झाला तरच साळवी कुटुंबाच्या लेकीचा हात त्याच्या हातात देण्यात येणार आहे. ओमची आई शकुचासुध्दा ओमने या परिक्षेला सामोरं जाण्यासाठी बक्कळ पाठिंबा आहे. आता  ओम या कठीण परिक्षेत यशस्वी होत स्वीटूचं प्रेम आणि साळवी कुटुंबाचा होकार कसा मिळवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Recommended

Loading...
Share