ठरलं तर ! 'आई कुठे काय करते' मालिकेत या दिवशी होणार अरुंधती आणि अनिरुध्दचा घटस्फोट

By  
on  

 ‘आई कुठे काय करते’ मालिका आता खुप मोठ्या रंजक वळणावर आहे. जो क्षण प्रेक्षकांनासुध्दा नको होता तो जवळ येतोय. तो म्हणजे अरुंधतीचा घटस्फोट. कारण घटस्फोटोनंतर ती घरापासून दूर जाणार आहे. 

शेखर आणि यश या दोघांनी अंकिताचा खोटेपणा सर्वांसमोर आणल्यामुळे अभिषेक नुकताच अंकिताच्या जाळ्यातून सुटलाय. अभिषेकने अंकिताला घराबाहेर काढल्यानंतर घरातील सर्व कुटुबियांनी सुटकेचा श्वास घेतलाय. अभिषेकच्या आयुष्यातलं अंकिता नावाचं संकट दूर गेल्यामुळे आता तो मुक्त होऊन खूपच आनंदीत होतो. समृद्धी बंगल्यात आनंदाचं वातावरण असतानाच एक नवं वळण येतं ते अनिरूद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटाचं.

स्टार प्रवाहनं नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज केलाय. अभिषेकला आनंदी पाहून अरुंधती म्हणते, “आज किती दिवसांनी तुला आनंदी बघतेय.” यावर खूपच मोकळ्यापणाने बोलतो, “आई, यापुढे तु मला कायम आनंदीत बघशील.” समृद्धी बंगल्यात घरातील सगळेच जण सकाळी नाश्ता करायला बसतात. इतक्यात घरातला फोन वाजतो आणि अरूंधती फोन उचलते. फोनवर बोलल्यानंतर ती गंभीर होऊन स्तब्ध होते. तिला गंभीर झालेलं पाहून अभिषेक अरुंधतीला काय झालं असं विचारतो. यावर अरुंधती म्हणते, “कोर्टातून फोन आला होता…आणि घटस्फोटाची तारीख आली आहे…पुढच्या आठवड्यात कोर्टात बोलवलं आहे…” हे ऐकल्यानंतर घरातील सगळेच जण टेन्शनमध्ये येतात आणि दुःखी झालेल्या अरुंधतीकडे पाहु लागतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

अनिरूद्धच्या आई तर सुरवातीपासूनच अनिरूद्ध आणि अरुंधती यांच्या घटस्फोटाला विरोध करत होत्या. अंकिताला घरातून बाहेर काढल्यानंतर तिच्या मनात संजनाला बाहेर काढण्याचा प्लॅन आखत असते. पण अशातच अचानक अनिरूद्ध-अरुंधतीच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे आई हादरून जातात. पुढच्या आठवड्यात कोर्टात बोलवलं आहे, हे ऐकून अनिरूद्धच्या पायाखालची जमिनच सरकते. यापूर्वी अनिरूद्धने घटस्फोट होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले होते. अरुंधती त्याला माफ करेल आणि घटस्फोटाचा निर्णय मागे घेईल, असं अनिरूद्धला वाटत होतं. पण अरुंधती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. पण ज्यावेळी घटस्फोटाची तारीख आली हे कळतं त्यावेळी ठाम असलेली अरुंधती मात्र थोडी बेचैन होते. कारण घटस्फोटानंतर अरुंधतीला समृद्धी बंगला सोडून तिला माहेरी जावं लागणार आहे.

अनिरूद्ध वरवर कितीही प्रामाणिक असल्याचं दाखवत असला तरी तो स्वतःशिवाय कोणाचा विचार करत नाही. केवळ स्वतःचा स्वार्थ त्याला महत्त्वाचा असतो. एकीकडे संजना अनिरूद्धसोबत लग्नाच्या तयारीला लागलेली आहे. त्या दोघांची लग्नपत्रिका देखील छापून आलेल्या आहेत. संजना त्यांची लग्नपत्रिका अरुंधतीला दाखवण्यासाठी येते. त्यावेळी अरुंधती थोडी आश्चर्य देखील होते.

त्यामूळे अनिरूद्ध-अरुंधतीच्या घटस्फोटाची तारीख आली असून येत्या १० जुलैचा एपिसोड रंजक असणार आहे. अखेर अनिरूद्ध-अरुंधतीचा घटस्फोट होणार असून त्यानंतर मालिकेत काय काय घडणार याचा अंदाज येत्या १० जुलैच्या एपिसोडमध्ये कळणार आहे.

 

Recommended

Loading...
Share