'आई कुठे काय करते' मालिकेचे 400 भाग पुर्ण, पाहा हा खास फोटो

By  
on  

नात्यांना वेगळं वळण मिळालं तरी त्यासोबतचे कंगोरे जपायचे असतात हाच संदेश ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने दिला आहे. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या खूप मोठ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. नुकतंच अभिषेकसमोर अंकिताचा खोटेपणा आला आहे. अभिषेकने अंकिताला घराबाहेर काढल्यानंतर घरातील सर्व कुटुबियांनी सुटकेचा श्वास घेतलाय.

 

 

अभिषेकच्या आयुष्यातलं अंकिता नावाचं संकट दूर गेल्यामुळे आता तो मुक्त होऊन खूपच आनंदीत होतो. समृद्धी बंगल्यात आनंदाचं वातावरण  आहे. याच आनंदात आणखी एक भर पडली आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने 400 भागांचा टप्पा गाठला आहे. अरुंधतीच्या भूमिकेत दिसणारी मधुराणीने टीमसोबतचा फोटो पोस्ट करत ही बाब शेअर केली आहे.

Recommended

Loading...
Share