By  
on  

रणजीतने दिलेली औषध बेतणार का बेबी मावशीच्या जीवावर ?

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत आता थरारक वळण येताना दिसत आहे. रणजित-संजीवनी आणि दादासाहेब यांच्यातील संघर्ष आता विकोपाला गेला आहे. दादासाहेबांचा खोट्या औषधांचा बिझनेसची पाळंमुळं खोदण्यासाठी संजीवनी सज्ज आहे. पण यादरम्यान या दोघांविरोधातील कट घरातच शिजतो आहे. बेबी मावशींसाठी आणलेल्या औषधांनी त्या कोमात गेल्या आहेत.

 

 

या औषधांना रणजितने स्वत:च्या हातानेच बेबी मावशींना दिली आहेत. पण या नकली औषधांमुळे बेबी मावशींची प्रकृती आणखीच बिघडली आहे. रणजित ही औषधं घेतानाचा पुरावाही दादासाहेंबांकडे आहे. त्यामुळे रचलेल्या कटात रणजीत अडकेल का? की संजीवनीला या कारस्थानाचा लवकरच सुगावा लागेल हे मात्र काळच ठरवेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive