‘अग्गबाई सुनबाई’ मालिका लवकरच घेणार निरोप?

By  
on  

अग्गबाई सासूबाई नंतर आता अग्गबाई सूनबाई ही मालिका देखील रंजक वळणावर पाहायला मिळतेय. या मालिकेतील शुभ्रा खूप वेगळी आहे. तर आसावरीने घराची सगळी सूत्र हाती घेतली आहेत. अभिजीत राजेंनी मात्र घरची जबाबदारी स्विकारली आहे. पण अग्गबाई सुनबाई ही मालिका अग्गबाई सासूबाई इतका प्रभाव पाडू शकली नाही.

 

 

त्यामुळेच ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे. दुस-या भागात मालिकेचा ट्रॅक पुर्णपणे वेगळा झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्याने ट्रोलिंगही मोठ्या प्रमाणावर केलं गेलं. त्यामुळेच या मालिकेचा गाशा गुंडाळला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

Recommended

Loading...
Share