‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत आता होणार या अभिनेत्रीची एंट्री

By  
on  

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत आता रंजक वळण येताना दिसत आहे. शालिनी कोल्हापूरमध्ये होणाऱ्या मिसेस ब्युटी काँटेस्टमध्ये स्पर्धेच्या तयारीत गुंतली आहे. ह्याच सौंदर्य स्पर्धेत गौरीनेही सहभाग घ्यावा आणि ही स्पर्धा तिने जिंकावी असा आग्रह जयदीपने धरला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या सगळ्या धामधुमीत या मालिकेत नव्या पात्राची एंट्री होणार आहे. या मालिकेत शालिनीच्या मदतीला आता सॅण्डी येणार आहे. अभिनेत्री नयना मुके सॅण्डीच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. नयनाने यापुर्वी कलर्स मराठीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ या लोकप्रिय मालिकेतून तिने लक्ष्मी मातेची भूमिका साकारली होती. बऱ्याच प्रतीक्षेनंतर नयना पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळलेली पाहायला मिळत आहे.

Recommended

Loading...
Share