‘देवमाणूस’ मालिका निरोपाच्या उंबरठ्यावर? वाचा सविस्तर

By  
on  

अनेक रहस्य आणि रंजकतेने परिपुर्ण मालिका म्हणजे देवमाणूस. या मालिकेत अनेक वळणं आली. प्रेक्षकांनी या मालिकेला आणि यातील व्यक्तिरेखांना डोक्यावर घेतलं. सरु आजी, अजित देव, डोन्या ,बाबू दादा आणि डिंपल या व्यक्तिरेखांना विशेष लोकप्रियता मिळाली. ही मालिका आता अंतिम टप्प्यावर आहे. स्वत:ला निर्दोष सिद्ध केलेल्या अजित कुमार समोर आता नवीनच संकट उभं ठाकलं आहे.

 

 

अजितच्या विजयाच्या जल्लोष सुरु असतानाच चंदाचा चेहरा समोर आला आहे. चंदाला पाहून अजित कुमार कोर्टातच बेशुद्ध पडला आहे. पण चंदा कोण आहे? कुठून आली याबाबत अजून अजित शिवाय कोणालाच माहिती नाही. पुढील महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल. तिच्या जागी १६ ऑगस्टपासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव ‘ती परत आलीये’ असे आहे. ही मालिका देखील रहस्यमय जॉनरची मालिका आहे.

Recommended

Loading...
Share