बापूंचा शब्द की अभीची साथ? लतिका नक्की काय निवडणार

By  
on  

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत आता बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित शर्यतीचा क्षण आला आहे. अभिमन्यूने ज्या शर्यतीची तयारी वर्षभर केली होती. तो क्षण आता येऊन ठेपला आहे. बापूंच्या रागामुळे अभि आणि लतिकाच्या नात्यात दुरावा आला. पण अभिचं लतिकावर असलेलं निस्सिम प्रेम सगळ्यांना माहिती आहे.

 

 

केवळ लतिकाला या प्रेमाची जाणीव झाली आहे. पण आता यांच्या प्रेमात अडसर आहे तो बापूंचा. अभ्याच्या शर्यतीसाठी  लतिकाला जाण्यास बापूंनी मनाई केली आहे. आता लतिका बापुंचा शब्द अभ्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या क्षणासाठी मोडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

Loading...
Share