पुन्हा थरार उलगडणार, देवमाणूस 2 चा प्रोमो आला समोर

By  
on  

'देवमाणूस' मालिका आणि या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवत लोकांची मनं जिंकली. एक असा डॉक्टर जो त्याच्या गावात देवमाणूस म्हणून प्रचलित असतो मात्र त्याचा खरा क्रुर चेहरा समोर आल्यावर त्याची कशी तारांबळ उडते हे मालिकेत दिसलं.

 

 

डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. या मालिकेच्या अंतिम भागात काहीसा सस्पेंस ठेवत निर्मात्यांनी पुढील भागाचे संकेत दिले होते.  प्रेक्षकांनाही दुस-या सीझनची उत्सुकता आहे.

आता निर्माती श्वेता शिंदेने मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. ‘देवमाणूस 2 लवकरच.....’ असं या प्रोमोत दिसत आहे. आता मालिकेच्या दुस-या सीझनमध्ये देवमाणसाची आणखी कृष्णकृत्य बघायला मिळतात की मालिका नवं वळण घेते हे लवकरच समजेल.

Recommended

Loading...
Share