‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील कलाकार आणि निर्मात्यांवर या अभिनेत्रीने केले आरोप

By  
on  

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिका एकत्र कुटुंबाबत संदेश देणारी असली तरी सध्या या सेटवर मात्र काही आलबेल चाललेलं दिसत नाही. या मालिकेत सुर्याच्या आईच्या भूमिकेत दिसणा-या अन्नपुर्णा विट्ठल यांनी मालिकेतील कलाकार आणि निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 

 

 

युट्युबचॅनेलवरुन शेअर केलेल्या हिंदी व्हिडियोमध्ये त्यांनी ही व्यथा मांडली आहे. यात त्या म्हणतात, मराठी सिनेसृष्टीत अमराठी कलाकारांना काम करु दिले जात नाही. सहकुटुंब सहपरिवार ही मालिका मी गेल्या महिन्यात सोडली. त्यानंतर मला मालिकेतून बाहेर काढण्यात अशी अफवा पसरवण्यात आली. या मालिकेत मला मानसिक त्रास देणे, रॅगिंग करणे यात अभिनेत्यांमध्ये सुनिल बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर आणि दिग्दर्शकामध्ये भरत गायकवाड, विठ्ठल डाकवे यासारख्या छोटेमोठे कलाकार यात सहभागी होते.

सुनिल बर्वे हा मराठीतील मोठा अभिनेता आहे. पण त्यांनी मला सुरुवातीपासूनच त्रास दिला आहे. इतकच नव्हे तर नंदिता पाटकर आणि किशोरी आंबिये यांनीही मला प्रचंड त्रास दिला आहे. त्यांचं कधीही चांगलं होणार नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Recommended

Loading...
Share