By  
on  

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट ! पाहा देवमाणूस फेम डॉ. अजितकुमारचा पुतळा

'देवमाणूस' मालिका आणि या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. देवमाणूस साकारणारा अभिनेता किरण गायवाडसुध्दा या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय ठरला.  प्रेक्षकांचा निरोप घेताना. दहा जणांचे खून करणारा देवी सिंग उर्फ अजित कुमार देवचा चंदा खून करते आणि हे डिंपल बघते व डिंपल चंदाचा खून करते, असं दाखविण्यात आलं असलं तरी शेवटी मात्र हॉस्पिटलमध्ये पुन्हा जिंवत झालेला देवी सिंग पाहून देवमाणूसचा सिक्वल येणार अशी शक्यता वर्तवली जात होती त्यानुसार आता देवमाणूसस 2 चे प्रोमो झळकतायत. सगळ्यांचा लाडका हा 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार.

देवमाणूसच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असून मालिकेचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मालिकेचा नवीन प्रोमो पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. किरण गायकवाडनं एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत कातळवाडीतील ग्रामस्थांनी देवमाणसाचा म्हणजेच डॉ. अजित कुमार देवचा पुतळा उभारला

 

कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई या ठिकाणी देवमाणूस मधील प्रमुख व्यक्तिरेखा डॉ अजितकुमार देवचे अर्धाकृती पुतळे पाहायला मिळले. आपल्या ओळखीच्या परिसरात अचानक हे पुतळे पाहून प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive