By  
on  

देवमाणूस मालिकेतील हा कलाकार मालिकेच्या दुस-या सीझनमध्ये दिसणार नाही

देवमाणूस या रहस्यमय थरारक  मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेच्या अफाट यशानंतर आता लवकरच या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या मालिकेचे संपूर्ण महाराष्ट्रभर असंख्य चाहते आहेत. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरल्या आहेत. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंगच्या व्यक्तिरेखेतील किरण गायकवाड, टोण्या, सरु आजी, डिंपल, बाबूदादा, मंगलताई, बज्या, नाम्या या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

पहिल्या सीझनमधील सर्व कलाकार पुन्हा दिसणार की नाही, या बद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. परंतु आता पहिल्या सीझनमधील एक कलाकार या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार नसल्याचं समजतंय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kiran Dange (@kirandange03)

बज्या हे पात्र साकारणारा अभिनेता किरण डांगे आता देवमाणूस मालिकेत झलकणार नाही अशी माहिती मिळतेय. किरण सध्या स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेत भूमिका साकारतोय. त्यामुळं तो देवमाणूसमध्ये दिसणार की नाही याबाबत मालिका सुरु झाल्यावरच समजेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kiran Dange (@kirandange03)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive