Video : इंग्रजीमध्ये बोलून पशाने सर्वांनाच केले चकित... 'सहकुटुंब सहपरिवार'

By  
on  

'सहकुटुंब सहपरिवार' ही रसिक प्रेक्षकांची लाडकी मालिका. नावाप्रमाणेच संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन चालणारा मोठा भाऊ सूर्या व त्याची पत्नी सरु. गेले दोन अडीच वर्ष मोरे कुटुंबाची ही गोष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. अंजी-पश्याची लव्हस्टोरीसुध्दा प्रेक्षकांना खुप भावते.पश्याच्या राहणीमानामुळे अंजीला तो आवडत नाही. तिला त्याची लाज वाटते. पण तसं असलं तरी अंजी पश्याला त्याच्या प्रत्येक सुख-दु:खात पाठीशी खंबीरपणे उभी राहते. 

वैभव आमि अवनी आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे अवनीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करण्यात येत आहे. प्रत्येक जण अवनीच्या खास कार्यक्रमाला हजर असतो आणि तिला व बाळाला शुभेच्छा देतो. जेव्हा पश्या अवनीला भेटायला येतो. तेव्हा सर्वांसमोर अवनी बाळा हा बघ आला तुझा अडाणी काका म्हणून त्याचा पाणउतारा करते...हे पाहून बाजूला उभी असलेली अंजी या अपमानाने भर कार्यक्रमातून निघण्याच्या तयारीत असतानाच ..पश्या तिचा हात धरुन इंग्रजीत तिला अडवतो व सर्वांसमोर एक छोटंसं इंग्रजीतलं भाषण देतो. ..ते ऐकून सारेच अवाक् होतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Recommended

Loading...
Share