ठिपक्यांची रांगोळी : अपूर्वा शशांकच्या केळवणात आनंदाचे रंग भरण्यासाठी दीपाची खास हजेरी

By  
on  

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत सुरु आहे शशांक अपूर्वाच्या विवाहसोहळ्याची लगबग. संपूर्ण कानेटकर आणि वर्तक कुटुंब या लग्नासाठी उत्सुक असून लग्नाआधीच्या विधींना जल्लोषात सुरुवात झाली आहे. शशांक आणि अपूर्वाच्या केळवणासाठी सध्या जय्यत तयारी सुरु असून केळवणासाठी पाहुणी म्हणून हजेरी लावणार आहे रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा. जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा. या दोघांचं केळवणही हटके असणार हे वेगळं सांगायला नको. त्यामुळेच या दोघांच्या केळवणात आनंदाचे रंग भरण्यासाठी दीपा खास हजेरी लावणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ठिपक्यांची रांगोळी रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Recommended

Loading...
Share