म्हणून आई कुठे काय करतेची अरुंधती आहे मालिकेतून गायब

By  
on  

अभिषेक-अनघाचं लग्न पार पडल्यानंतर आई कुठे काय करतेची अरुंधती म्हणजेच आई मालिकेतून गायब आहे. इतर व्यक्तिरेखांभोवती मालिकेचं कथानक फिरतंय. आईशिवाय मालिका सुरु आहे व गेले कित्येक दिवस तसंच चाललंय. मालिकेतलं मुख्य पात्रचं दिसत नसल्याने अरुंधती गेली कुणीकडे असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. आज दिसेल उद्या दिसेल अशा आशेवर प्रेक्षक आहे. अभिच्या लग्नानंतर आपल्या आईसोबतत अरुंधती देवदर्शनाला गेल्याचा उल्लेख इतर पात्रांच्या तोंडी आहे.

अरुंधती मालिकेत का दिसत नाही? नेमकं काय झाले? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. पण मधुराणीची तब्बेत ठिक नसल्यामुळे तिने काही दिवस चित्रीकरणातून सुट्टी घेतली आहे. त्यामुळे ती मालिकेच्या भागांमध्ये दिसत नाहीये. मधुराणी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत.

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख निर्माण झाली आहे. मधुराणी साकारत असलेली अरुंधती देशमुख ही व्यक्तिरेखा आज अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातली ताईत आहे.

Recommended

Loading...
Share