माझी तुझी रेशीमगाठ : पाहा नेहा आणि यशच्या साखरपुडयाचे खास क्षण

By  
on  

छोट्या प़डद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. लवकरच यश आणि नेहाचा लग्नबार उडणार आहे. ्प्रेक्षकांना या बहुचर्चित लग्नसोहळ्याचे वेध लागले असतानाच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत.

परी ही नेहाची मुलगी आहे हे सुरुवातीला समजल्यावर आजोबा नाराज झाले होते, परंतु आता त्यांचा गैरसमज दूर झाला असून त्यांनी नेहा व यशच्या लग्नाला परवानगी दिली, त्यामुळे ग्रॅंड वेडिंगची लगबग मालिकेत सध्या पाहायला मिळतेय. 

 

नेहा यशच्या लग्नात बॅचलर पार्टी, मेहंदी, हळद, संगीत आणि लग्नसोहळा असा सर्व शाही थाट पाहायला मिळणार आहे. साखरपुड्याला यशच्या हातात एक नाही तर दोन अंगठ्या पाहायला मिळत असल्याने एक ट्विस्टही असणार आहे.  

Recommended

Loading...
Share