सुख म्हणजे नक्की काय असतं! पाहा अनिल - जयदिपच्या नादात मानसी 'लटकली'

By  
on  

छोट्या पडद्यावरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या तुफान गाजत असून मालिकेतील नवनवीन ट्विस्ट्स मुळे या मालिकेला लोकप्रियता मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत गौरीला मारण्याच्या कटाविरुद्ध कोर्टात केस चालू असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले. यात गौरीला मारणारा हा खरा जयदीप नसून त्याचं रूप घेतलेला अनिल होता हे समजलं. 

एका उंच कड्यावर गौरी आणि मानसी भेटतात तेव्हा गौरीला पुन्हा एकदा जीवे मारण्याचा मानसीचा डाव असतो. तेव्हा गौरीला ढकलत असताना मानसीचा तोल जातो आणि ती स्वतःच दरीत कोसळते. यावेळी गौरी मानसीला वाचवण्यासाठी तिचा हात धरते आणि सत्य काय आहे हे विचारते तेव्हा मानसी गौरीला मारणारा हा खरा जयदीप नसून तो अनिल होता असं सांगते. 

 

 

दरम्यान या संपूर्ण सीनच्या पडद्यामागील क्षणांचा एक खास व्हिडीओ मालिकेतील मानसी म्हणजेच अभिनेत्री अभिनेत्री अश्विनी कासार हिने तिच्या तिच्या सोशल मीडियावर शेयर केला आहे. ज्यात तिला एका मोठ्या क्रेनला लटकवलेले दिसत आहे. त्याचबरोबर मालिकेची संपूर्ण टीम या सीन्ससाठी मेहनत घेताना दिसून येत आहे. या व्हिडीओ खाली मानसीने 'अनिल जयदीपच्या नादात मानसी लटकली' असे मजेशीर कॅप्शन टाकलं आहे. तिच्या या व्हिडीओखाली चाहत्यांनी अनेक कमेंट्स करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Recommended

Loading...
Share