टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' सोबत 'या' मालिकांनी देखील मारली बाजी!

By  
on  

टेलिव्हिजन क्षेत्रात टीआरपी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असून या टीआरपीसाठी मालिकेच्या तंत्रज्ञांसह कलाकार देखील मेहनत घेत असतात आणि त्यासाठी मालिकेत एकाहून एक सॉलिड ट्विस्ट आणले जात असतात.

या आठवड्यात प्रेक्षकांची लाडकी मालिका 'मन उडू उडू झालं' मालिका टीआरपीच्या शर्यतीतून बाहेर पडली असून तर रंग माझा वेगळा ही मालिका या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

तर गेली अनेक दिवस मागे पडलेली 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. मालिकेला 6.6 रेटींग मिळालं आहे. आई कुठे काय करते' ही मालिका 6.4 रेटींगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तर चौथ्या क्रमांकावर 'फुलाला सुंगध मातीचा' ही मालिका आहे. कीर्ती आणि शुभम यांची नवी गोष्ट 6.1 रेटींगसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेला 6.0 इतके टीआरपी रेटिंग मिळाले आहेत.

गेल्या एका महिन्यापासून 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे तर 'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या नंबरवर होती. पण या आठवड्यात दुसऱ्या नंबरचा मान 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मलिकेला मिळाला आहे.

Recommended

Loading...
Share