'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेचे ६०० भाग पूर्ण

By  
on  

कलर्स मराठी वरील सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. 

अभि - लतिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावत असून या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा ओलांडला आहे. याबद्दलची एक खास पोस्ट चॅनेलच्या सोशल मीडियावर पेजवरून शेयर करण्यात आली आहे. #अभि आणि लतिका यांच्या निस्वार्थ प्रेमाची कहाणी' या कॅप्शनसोबत ही पोस्ट शेयर करण्यात आली आहे.

मालिकेत सध्या अभिलाषाने लतिकाला कीडनॅप केलं आहे. त्यामुळे लतिकाला सोडवण्यासाठी अभि आक्कासाहेबांच्या गाडीतून लपून जात आहे. पण वाटते आक्कासाहेबांची गाडी अडवली जाते, त्यामुळे अभि लतिकाला सोडवू शकेल की दौलतच्या तावडीत सापडेल? हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान सुंदरा मनामध्ये भरली मालिकेचे ६०० भाग पूर्ण झाल्याबद्दल  प्रेक्षकांनी आणि कलाकारांच्या चाहत्यांनी त्यांचे सोशल मीडियावर अभिनंदन करत शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Recommended

Loading...
Share