'आई कुठे काय करते' मालिकेत नवीन ट्विस्ट ; संजनामुळे अनघाचा होणार अपघात

By  
on  

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असून या मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे मालिकेची प्रेक्षक पसंती वाढत चालली आहे. देशमुखांच्या घरात आता नव्या पाहुण्याची चाहूल लागल्यामुळे घरात अगदी आनंदी वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.

पण इतक्यातचं मलिकेत आता एक नवीन ट्विस्ट येणार आहे. संजनामुळे अनघाचा अपघात होणार असून या सगळ्या प्रकारात अनिरुद्ध संजनाला जबाबदार धरणार आहे आणि यामुळे तो संजनावर रागावणार आहे.

याबाबत मालिकेचा नुकताच एक एक प्रोमो समोर आला असून प्रोमो पाहून प्रेक्षकांनी अनघाविषयी चिंता व्यक्त केली आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, संजना रुममधून फोनवर बोलत खाली येत असते. तर अनघा देखील त्याच जिन्यानं तिच्या रुमकडे जात असते. घाई गडबडीत असलेल्या संजनाचा अनघाला धक्का लागोत आणि जिन्यावरुन अनघाचा पाय सटकतो. पाय सटकल्यानं अनघाचं डोक भिंतीला आपटतं आणि जिन्यावरुन खाली पडते. 

अनघाला पडताना पाहून संजना मोठ्याने ओरडते. यामुळे अनिरुद्ध बाहेर येतो आणि अनघाला सावरतो.  हा सगळा प्रकार पाहून अनिरुद्ध संजनावर भडकतो. "संजना आज तू विकृतपणाचा कळस केलाय. संजनाला मुद्दाम ढकललंस" असं म्हणत मोठ्याने तिच्या अंगावर ओरडून तिला सुनावतो. अनिरुद्धनं केलेला आरोप ऐकून संजना पूर्ती हादरुन जाते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

मात्र संजनाने हे मुद्दाम केलं नसून तिच्या नकळत हे सगळं घडलं आहे. हे प्रोमोमध्ये पाहून कळतंय. त्यामुळे आता संजना संजना तिची बाजू सिद्ध करु शकेल का? आणि देशमुखांची यावर काय प्रतिक्रिया असेल हे येत्या भागांतून पाहायला मिळेल.

Recommended

Loading...
Share