योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत बाल शंकराला साक्षात्कार ‘शिव अवताराचा’...

By  
on  

कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर ही मालिका सध्या अभूतपूर्व,अचंबित करणाऱ्या घटनाक्रमांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. अवलिया सिद्धयोगी शंकर महाराज यांचा विस्मयचकित करणारा जीवन अध्याय उलगडणाऱ्या या मालिकेत सध्या शंकर महाराजांच्या बालपणाचा टप्पा उलगडतो आहे.

दैवी लीला ही अजब असते आणि देव जेव्हा मानवी अवतारात प्रकटतो तेव्हा घडणारा ईश्वरी चमत्कार,प्रत्यय हा विलक्षण अनुभूति देणारा असतो.

योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत असाच एक मोठा टप्पा येत्या २८ आणि २९ जूनला प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

बाल शंकराला ‘कोsहम अर्थात मी कोण’ हा पडलेला प्रश्न श्री स्वामी समर्थांच्या एका दैवी संकेताने सोडवला जाणार असून क्षण दिव्य अनुभूतीचा, साक्षात्कार शिव अवताराचा असे अलौकिक वर्णन असलेला हा सुवर्ण क्षण प्रेक्षकांना संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीवर योग योगेश्वर जय शंकर या मालिकेत अनुभवता येईल.

Recommended

Loading...
Share